सर्वात मोठे टायर असलेली इलेक्ट्रिक स्कूटर ! 161Km रेंज, 90Kmph चे टॉप स्पीड, फक्त 40,000 रुपये भरा अन्..

देशातील एक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड ओकिनावा (Okinawa) असून यामध्ये मॉडेल्सची एक अफाट कॅटेगरी आहे. तुम्ही कोणत्याही बजेटमध्ये ओकिनावा (Okinawa) ब्रँडकडून ई – स्कूटर खरेदी करू शकता जी तुम्हाला सरस अशी बिल्ट – क्वालिटी आणि रियालिटीसह मिळते.आज आपण ज्या स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव ‘Okinawa OKHI-90’ आहे.

ही एक हाय स्पीड आणि लाँग रेंज इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्यामध्ये तुम्हाला अद्भुत कम्फर्ट देखील मिळतो. Okinawa च्या OKHI-90 बद्दल संपूर्ण माहिती चल तर मग त्याची किंमत आणि EMI प्लॅन बद्दल जाणून घेऊयात..

परफॉरमेंस आणि रेंज :-

Okinawa OKHI-90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला हाय-परफॉरमेंस आणि लॉन्ग कॅटेगरी पाहायला मिळते ज्यामुळे ही स्कूटर खूप खास बनलेली आहे. या ई-स्कूटरमध्ये तुम्हाला एक पॉवरफुल 2500W मोटर मिळते जी 3800W ची पीक पॉवर क्रीट करते आणि ती तासाला 90 किलोमीटर वेगाने धावते .

तसेच, या स्कूटरमध्ये तुम्हाला पॉवरफुल 72V50AH लिथियम – आयन बॅटरी पॅक मिळेल जो एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 160 किलोमीटरची रेंज तर देईलचं तर या ई – स्कूटरसोबत एक फास्ट चार्जर उपलब्ध करून देते जे केवळ 5 ते 6 तासांत पूर्णपणे चार्ज करण्यास सक्षम आहे.

प्रीमियम फीचर्स..

नवीन Okinawa OKHI-90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला अनेक प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतात ज्यामुळे ती खूपचं लक्झरी बनते. या स्कूटरमध्ये तुम्हाला 16 – इंच अलॉय व्हील्स मिळतात जे स्कूटरला जबरदस्त कम्फर्ट देतात. याशिवाय, तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेंशन, डिस्क ब्रेक, एलईडी लाइट, ड्युअल स्प्रिंग रिअर, एलईडी हेडलाइट मिळतात.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला रिमोट अनलॉक, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, थ्री राइडिंग मोड, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, अँटी-थेफ्ट अलार्म, साइड स्टँड अलर्ट, रियर डिस्क ब्रेक आणि बरेच काही यासारखे अनेक मजेदार फीचर्स मिळतात. या Okinawa स्कूटरमध्ये तुम्हाला चांगली बूट स्पेस, फास्ट चार्जर मिळेल. ही एक उत्तम ई – स्कूटर आहे जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात मोठा आधार देते.

किंमत आणि EMI प्लॅन जाणून घ्या :-

Okinawa OKHI-90 इलेक्ट्रिक स्कूटर फक्त एकाच व्हेरियंटमध्ये येते जिची किंमत ₹1,86,208 ऑन-रोड आहे.अशा हाय-परफॉरमेंस स्कूटरसाठी ही एक चांगली किंमत आहे. तुम्ही फक्त 40,000 रुपये भरून देखील ते खरेदी करू शकता, त्यानंतर तुम्हाला पुढील 48 महिन्यांसाठी 4460 रुपयांचे हप्ते पाडून घेऊ शकता..

Leave a Comment