देशात इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि स्कूटींची मागणी झपाट्याने वाढत आहे . OLA पासून Ather,TVS पर्यंत, इतर प्रत्येक कंपनी इलेक्ट्रिक टू – व्हीलर बनवण्यावर भर देत आहे. अलीकडेच Ather Energy ने आपली सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Apex लाँच केली.
कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंतची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि तिची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे. आता या इलेक्ट्रिक स्कूटरला कोणतीही स्कूटर टक्कर देऊ शकत असेल तर ती OLA S1 Pro आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर OLA ची सर्वात पॉवरफुल आणि महागडी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आता या दोन स्कूटरची तुलना करून जाणून घेऊया की, Ather 450 Apex आणि OLA S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरपैकी कोणती स्कुटर आहे तुमच्यासाठी बेस्ट..
Ather 450 Apex Vs OLA S1 Pro : किती आहे रेंज..
Ather Energy च्या अधिकृत वेबसाइटनुसार, Ather 450 Apex ची सर्टिफाईड रेंज 157 किलोमीटर आहे, तर OLA S1 Pro ची सर्टिफाईड रेंज 195 किलोमीटर आहे. आता रेंजच्या बाबतीत पाहिलं तर OLA S1 Pro एथरच्या पुढे आहे परंतु एथरचा दावा आहे की, त्याची इलेक्ट्रिक स्कूटर ही आजपर्यंतची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आहे…
एथर 450 अपेक्स Vs ओला S1 प्रो : टॉप स्पीड..
Ather च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 100 km/h आहे, तर OLA S1 Pro चा टॉप स्पीड 120 किमी / ताशी आहे. टॉप स्पीडच्या बाबतीतही ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एथरच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मागे टाकते. अन् किंमतीच्या बाबतीतही एथरची इलेक्ट्रिक स्कूटर ओलाच्या स्कूटरपेक्षा महाग आहे.
एथर 450 अपेक्स Vs ओला S1 प्रो : किमतीत किती आहे फरक ?
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Ather 450 Apex ची एक्स – शोरूम किंमत 1.89 लाख रुपये आहे. तर OLA S1 Pro ची एक्स – शोरूम किंमत 1.47 लाख रुपये आहे. Ather ची इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 2.9 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडते. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर Ather च्या न्यू स्कूटरमध्ये 3.7kW बॅटरी आहे, तर Ola S1 Pro मध्ये 4kW बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
एथर 450 अपेक्स Vs ओला S1 प्रो : किती वेळात होणार चार्ज ?
इथे मात्र एथर 450 अपेक्स ने बाजी मारली आहे,एथर च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला चार्ज होण्यासाठी 5.45 तास लागतात तर OLA S1 Pro स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी 6.5 तास लागतात. फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट्स, टेललाइट्स आणि इंडिकेटर आहेत. 22 लीटरचा बूट स्पेस उपलब्ध आहे, तर Ola S1 Pro मध्ये 34 लीटरचा बूट स्पेस उपलब्ध आहे..
