आज आपण महाराष्ट्र भुलेख 7/12 उतारा कसा पहायचा अन् डाउनलोड करायचा याबाबत जाणून घेणार आहोत, महसूल विभागाने महाराष्ट्र भूमी अभिलेख 7/12 आणि 8A अभिलेख ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भुलेख महाभूमी वेब पोर्टलवर तुम्ही घरबसल्या 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता..
संपूर्ण माहितीसाठी, हा लेख पूर्णपणे आणि काळजीपूर्वक वाचा. भूमिलेख महाराष्ट्रावर पूर्वी जमिनीची माहिती उपलब्ध होती. मात्र आता हे वेब पोर्टल स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे भुलेख महाभूमी वेब पोर्टलवर 7/12 उतारा ऑनलाइन उपलब्ध आहे..
या पोर्टलवर सर्वेक्षण नंबर, गट नंबर टाकून सातबारा ऑनलाइन पाहता येणार आहे. जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे ऑनलाइन पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही विशेष अनुभवाची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवर शेत जमीनीचा गट नंबर टाकून डिजिटल 7/12 ऑनलाइन कसे पाहता येईल ते पाहूया..
महसूल विभागाने 7 / 12 आणि 8 A जमिनी ऑनलाइन पाहण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे. यासोबतच महाराष्ट्राचा भूमी नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in हे अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही पोर्टलवरून शेतकरी त्यांच्या जमिनीची माहिती आणि रेखा चिन्हांकित नकाशे डाउनलोड करू शकतात.
सर्वप्रथम ई महाभूमीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या :- https://bhulekh.mahabhumi.gov.in/

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिसणार्या नकाशावर तुमचा विभाग निवडा (जसा आपण पुणे निवडला आहे )
पुणे विभाग निवडल्यानंतर go वर क्लिक करा.
जिल्हा तालुक्याचे गावाचे नाव शोधा.
गट नंबर – सर्वेक्षण नंबर प्रविष्ट करा.
उदाहरणार्थ, आम्ही संपूर्ण नावासहित सातबारा पाहण्याची प्रक्रिया लिहित आहोत.

गावातील एकूण नावे क्रमांक निवडा.
नाव निवडा आणि मोबाईल नंबर टाका.
7/12 पहा वर क्लिक करा.

या प्रक्रियेच्या आधारे तुम्ही महाराष्ट्र पुणे विभागातील इतर जिल्ह्यांचा सातबारा ऑनलाइन पाहू शकता. या प्रोसेसने स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर सोपं होईल..
