आता तलाठयाकडे न जाता फेरफार नोंदवता येणार ! पहा ‘या’ 8 फेरफार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे अन् अंदाजित दर..

राज्य शासनाने आता सातबारा उताऱ्यासह इतर सात प्रकारच्या नकलांची फी 15 रुपयांवरून 25 रुपये केली आहे. तसा निर्णय शासनाने जारी केला असून, आता शेतकऱ्यांना सातबारा नक्कल काढण्यासाठीदेखील पैसे मोजावे लागणार आहेत. ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्यानंतर तलाठ्याकडील हस्तलिखित नकला मिळणे बंद झाले आहे. आता शेतीचा गाव नमूना 8 अ, फेरफारसाठीसुद्धा 25 रुपये आणि प्रति प्रिंटसाठी 2 रुपये आकारले जाणार आहेत.

तलाठ्याशी संबंधित कागदपत्रे घेण्यासाठी आता पटवाऱ्याकडे जाण्याची गरज नाही. ई – फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नंबर 7/12 8 – अ संगणकीकृत करण्यात आले आहेत.

संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यांची नक्कल फी शासनाने निश्चित केली आहे. दिलेल्या दरानुसार सेतू, आपले सरकार महा सेवा केंद्रांमार्फत नकला उपलब्ध करून दण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचे दरदेखील निश्चित केले आहेत . ठरवून दिलेले दर जास्त असून एका नकलेसाठी 25 रुपये मोजावे लागणार आहेत.

पूर्वी फुकटात भेटणारे उतारे आता महागले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना आता या दरवाढीची माहितीच नसल्याने ते संबंधित सेतूसंचालकांना पैसे देताना प्रश्न विचारत आहेत. मात्र, दरवाढीबद्दल शासनाला जाब विचारला जात नाही. भूलेख संकेतस्थळावरील विनाशुल्क उपलब्ध होणारे विनास्वाक्षरी गाव नमुना सातबारा व गाव नमुना 8 – अ ज्यावर महाभूमिचा वॉटर मार्क असतो आणि ज्यावर क्यूआर कोड किंवा 16 अंकी पडताळणी

क्रमांक दर्शविलेला नसतो, असे अधिकार अभिलेख फक्त माहितीसाठी असून ते कोणत्याही कायदेशीर व शासकीय कामासाठी अवैध समजण्यात येतात. सदर विनास्वाक्षरीत गाव नमुना 7/12 व 8 अ कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र, महा ई – सेवा केंद्र सेतू केंद्र अथवा संग्राम केंद्रचालकांना त्यांच्या सहीशिक्क्याने विक्री किंवा वितरित करता येणार नाही.

ई – प्रणालीद्वारे ‘सेतू’त नोंदविला जाणार फेरफार..

सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई – सेवा केंद्र यांच्याकडूनदेखील आता फेरफार नोंदविण्यासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे व अंदाजित दर निर्धारित केले आहे. त्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही.. खाली दिलेला चार्ट पहा..

7/12, वारस नोंदी, बोजा, शेरा, ई. प्रलंबित फेरफार पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

अशी होणार 25 रुपयांची विभागणी..

25 रुपयांमधून राज्य शासन 5 रुपये,जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमिअभिलेख पुणे यांच्याकडील स्विय प्रपंजी लेखा खाते 10 रुपये आणि सेतू, आपले सरकार, महा ई सेवा केंद्र यांना 10 रुपये अशा प्रकारे ही विभागणी होणार आहे. अतिरिक्त पेज असल्यास प्रति पेज 2 रुपये आकारणी सेवा केंद्र चालकास घेता येणार आहे.

Leave a Comment