Honda च्या इलेक्ट्रिक स्कुटरची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री ! तब्बल 300Km रेंज अन् 120 चं स्पीड, किंमतही स्वस्त..

होंडा ऑटोमोबाईल कंपनी अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट वाहने पुरवत आहे. टू व्हीलर व्हीकलकडे पाहिले तर होंडाने अनेक जबरदस्त वाहने उपलब्ध करून दिली आहेत. जर आपण स्कूटर कॅटेगरीबाबत पाहिलं तर, होंडाची ॲक्टिव्हा ही स्कूटर बाजारात आतापर्यंत सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. परंतु आता मार्केटमधील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन कंपनी आता ॲक्टिव्हाला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च करणार आहे. त्यामुळे आगामी काळात ही स्कूटर इलेक्ट्रिक अवतारातही बाजारात खळबळ माजवू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

9 जानेवारीला होणार लॉन्च..

होंडाच्या इलेक्ट्रिक व्हर्जन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 9 जानेवारी 2024 रोजी भारतीय बाजारात लॉन्च केले जाईल. त्यांसन्तर तुम्हाला ते खरेदी करता येणार असून त्याचे बुकिंग उघडले जाणार आहे. तसं बघितलं तर 2024 च्या सुरुवातीला येणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटला एका वेगळ्या लेव्हलवर नेऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीला होंडा कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटरही कंपनीच्या अपेक्षांवर खरी उतरेल अशी अपेक्षा आहे.

300km ची असणार रेंज..

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्ही एका चार्जवर सुमारे 300km ची लांब रेंज मिळवू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जर याला एवढी लांब रेंज मिळाली तर ती बाजारात सर्वात लांब रेंज असलेली स्कुटर ठरणार आहे. यासोबत तुम्हाला आजपर्यंतचा सर्वात सुरक्षित बॅटरी पॅक मिळेल जो लिथियम आयन असणार आहे. या बॅटरी पॅकसह, तुम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी बेस्डवर आधारित BLDC इलेक्ट्रिक मोटर कनेक्ट करू शकता. जे त्याला बळ देण्याचे काम करेल..

100Kmph चे असणार स्पीड..

यामध्ये तुम्हाला एकच नाही तर अनेक फीचर्स पाहायला मिळणार आहेत. जे या इलेक्ट्रिक स्कूटरला आणखीनच अप्रतिम बनवते. इतकेच नाही तर तुम्हाला सुमारे 100 किमी / तास वेगाचा आनंदही मिळणार आहे. रिपोर्टनुसार त्याची भारतीय बाजारात एक्स – शोरूम किंमत ₹ 1.20 लाख असण्याची शक्यता आहे. तुम्हाला या किमतीत थोडे चढ-उतार दिसू शकतात..

2 thoughts on “Honda च्या इलेक्ट्रिक स्कुटरची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री ! तब्बल 300Km रेंज अन् 120 चं स्पीड, किंमतही स्वस्त..”

Leave a Comment