एसयूव्हीच्या विक्रीसोबतच भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारच्या विक्रीलाही वेग आला आहे. उत्कृष्ट मायलेज, ज्यादा स्पेस, जबरदस्त फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतींमुळे लोक त्या कार्सनां पसंती देत आहे.
रिपोर्टनुसार, अलिकडच्या काही महिन्यांत 7 सीटर कारच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण तुमच्यासाठी टॉप 7 सीटर कारबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी काही महिन्यांत मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय..
1. Kia Carens :
पुरेसा केबिन स्पेसव्यतिरिक्त, Kia Carens उत्तम सुरक्षा देखील देते. यात सहा एअरबॅग्ज, डाउनहिल ब्रेक कंट्रोल, ऑल – व्हील डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटर, रिअर पार्किंग सेन्सर, ABS यांसारखी उत्तम सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
Kia Carens मध्ये तीन इंजिन ऑप्शन आहेत, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन, 1.5 – लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 – लीटर डिझेल इंजिन. Kia Carens ची किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते..
2. रेनॉल्ट ट्रायबर :
ही बाजारपेठेतील सर्वात स्वस्त MPV तर आहेच, पण ती Renault ची भारतात सर्वाधिक विकली जाणारी कारही आहे. ट्रायबरमध्ये 1 – लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क निर्माण करते.
ट्रायबर कारची किंमत फक्त 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते. Renault Triber चे मायलेज (ARAI) 20 kmpl आहे. ट्रायबरला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.

3. मारुती सुझुकी एर्टिगा :
देशातील सर्व्हर जास्त खपणारी MPV म्हणजे मारुती एर्टिगा 1.5-लीटर पेट्रोल पॉवरट्रेनसह येते, जी 102bhp पॉवर आणि 136.8Nm टॉर्क निर्माण करते. Maruti Ertiga कारची किंमत 8.64 लाख रुपयांपासून सुरू होते..
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज मिळते. मारुती सुझुकी एर्टिगा ला एक नवीन 7 – इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळाली आहे जी Android Auto आणि Apple CarPlay लाही सपोर्ट करते.
4. महिंद्रा बोलेरो निओ :
बोलेरो निओ हे सर्वात किफायतशीर डिझेल वाहनांपैकी एक आहे. बॉडी – ऑन – फ्रेम निर्माणवर आधारित ही एक मजबूत एसयूव्ही आहे. यामध्ये तुम्हाला 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते जे 99bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क निर्माण करते.
महिंद्रा बोलेरो निओची किंमत 9.63 लाख रुपयांपासून सुरू होते. बोलेरोच्या नवीन मॉडेलमध्ये 7 – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, हाईट अँडजस्टेबल ड्रायव्हर सीट, किलेस एंट्री आणि थार प्रमाणेच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे..
5. Citroen C3 एअरक्रॉस :
मार्केटमध्ये सध्या मध्यम आकाराची SUV देणारी एकमेव उत्पादक कंपनी आहे. ही थ्री – रो एसयूव्ही कार 5 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
Citroen C3 Aircross मध्ये 1.2-लीटर टर्बो – पेट्रोल इंजिन आहे, जे 110PS पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनासोबतच यात 6 – स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. त्याचे प्रमाणित मायलेज 18.5 किलोमीटर प्रति लिटर आहे.
