यंदा नोव्हेंबर महिन्याच्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात नवीन गाड्यांची खरेदी केली. अशा स्थितीत तुम्हालाही प्रश्न पडला असेल की गेल्या महिन्यात कोणती कार सर्वाधिक विकली गेली ? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे, मारुती सुझुकीची सर्वोत्कृष्ट फॅमिली कार मानल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी वॅगनआर. या कारने सलग दुसऱ्या महिन्यातही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब पटकावला.
गेल्या नोव्हेंबरमध्ये, मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री झाली आणि तिने मारुतीच्या दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान डिझायर तसेच स्विफ्ट, टाटा नेक्सॉन, टाटा पंच, मारुती ब्रेझा यांना धोबीपछाड दिला केला. मारुती बलेनो, मारुती अर्टिगा, महिंद्रा स्कॉर्पिओ अन् ह्युंदाई क्रेटा यांसारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रवासी वाहनांना मागे टाकले आहे. चला, तर मग जाणून घेउया नोव्हेंबरमधील टॉप 10 कार्सबद्दल..
नोव्हेंबर 2023 मध्ये WagonR ची नेमकी किती झाली विक्री ?
गेल्या महिन्यात, म्हणजे नोव्हेंबर 2023 मध्ये, मारुती सुझुकी वॅगनआर 16,567 ग्राहकांनी खरेदी केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये WagonR च्या 14,720 युनिट्सची विक्री झाली होती, त्यामुळे या बजेट हॅचबॅकच्या विक्रीत वार्षिक 13 टक्के वाढ झाली आहे परंतु,वॅगनआरच्या मासिक विक्रीत मोठी घट झाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये 22 हजारांहून अधिक लोकांनी ती खरेदी केली होती..
मारुती सुझुकी Dzire ची मोठी झेप, दुसऱ्या स्थानावर..
मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान कारपैकी एक डिझायर गेल्या नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती सुझुकी डिझायर गेल्या महिन्यात 15,965 ग्राहकांनी खरेदी केली होती. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये Dzire च्या विक्रीत 20 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, 14,456 ग्राहकांनी Baleno खरेदी केली..
मारुती स्विफ्ट तिसऱ्या स्थानावर..
नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट ही तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली असून तब्बल 15,311 ग्राहकांनी स्विफ्टला पसंती दर्शवली. मारुती स्विफ्टच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मासिक विक्रीत मोठी घट झाली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये 20,598 लोकांनी स्विफ्ट खरेदी केली होती.
टाटा नेक्सॉन चौथ्या स्थानावर..
टाटा मोटर्सचे सर्वात लोकप्रिय वाहन Nexon नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. Nexon ला गेल्या महिन्यात 14,916 ग्राहकांनी खरेदी केले होते आणि ही वार्षिक 6 टक्क्यांची घट आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये 16,887 ग्राहकांनी Tata Nexon खरेदी केली..
टाटा पंच पाचव्या स्थानावर..
टाटा मोटर्सची लोकप्रिय मायक्रो SUV पंच गेल्या नोव्हेंबरमध्ये पाचव्या क्रमांकावर आली होती. Tata Punch गेल्या महिन्यात 14383 ग्राहकांनी खरेदी केले होते आणि ही वार्षिक 19 टक्के वाढ आहे. परंतु, मासिक आधारावर विक्रीत घट झाली आहे..
टॉप 10 मध्ये Maruti Suzuki च्या 6 गाड्या..
गेल्या नोव्हेंबरमध्ये 13,393 ग्राहकांनी खरेदी केलेल्या टॉप 10 कारमध्ये मारुती ब्रेझा 6 व्या क्रमांकावर होती. ब्रेझाच्या विक्रीत वार्षिक 18 टक्के वाढ झाली आहे. यानंतर मारुती बलेनो प्रिमियम हॅचबॅक आली, जी 12,961 ग्राहकांनी खरेदी केली. Maruti Ertiga MPV 8 व्या स्थानावर असून 12,857 ग्राहकांनी तीला खरेदी केले आहे. यानंतर महिंद्रा स्कॉर्पिओ सिरीज 9व्या स्थानावर होती, जिला 12,185 लोकांनी खरेदी केले. गेल्या नोव्हेंबरमधील 10वी सर्वाधिक विक्री होणारी कार Hyundai Creta होती, जी 11,814 ग्राहकांनी खरेदी केली होती..
मारुती सुझुकी WagonR : किंमत आणि मायलेज..
मारुती सुझुकी वॅगनआरची सध्याची एक्स – शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.42 लाख रुपयांपर्यंत जाते. वॅगनआरच्या पेट्रोल व्हेरियंट चे मायलेज 25.19 kmpl पर्यंत आहे आणि WagonR CNG व्हेरियंटचे मायलेज 34.05 km/kg पर्यंत आहे..
