भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये 7 सीटर कारचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत, परंतु त्यापैकी काही मोजक्याच कारची उच्च विक्री होत आहे. सध्या जेव्हा जेव्हा स्वस्त 7 सीटर कारचा विचार केला जातो तेव्हा Maruti Ertiga हे नाव नक्कीच समोर येतं. यामुळे अनेकांनी ही कार खरेदी केली आहे, मात्र आता मारुती एर्टिगाचे टेन्शन वाढलं आहे, कारण नव्या वर्षात आणखी एक 7 सीटर कारने तिच्यासाठी मोठा धोका निर्माण केला आहे.
आपण टोयोटाच्या 7 सीटर कारबद्दल जाणून घेत आहोत, ज्याचे बुकिंग पाहून कंपनीलाही विश्वास बसत नाही. आता त्या कारसाठी इतके बुकिंग येऊ लागले आहे की टोयोटाने आता नवीन बुकिंग घेणे बंद केले आहे. टोयोटाच्या या येणाऱ्या कारमुळे मारुती अर्टिगाच्या विक्रीत मोठी घट झाली आहे..
Toyota Rumion चा व्हेटिंग पिरियड..
Toyota Rumnion कारचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. त्याच्या बेस व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्यावर 5 ते 6 महिन्यांचा व्हेटिंग पिरियड आहे. या टोयोटा कारचे सीएनजी व्हेरियंट लोकांना खूपचं पसंत पडलं आहे. या कारणास्तव त्याचा व्हेटिंग पिरियड वाढवला होता. परंतु कंपनीने त्याचा व्हेटिंग पिरियड कमी करण्यासाठी टोयोटा रुमिओन च्या सीएनजी व्हेरियंटचे बुकिंग थांबवले आहे..
टोयोटा रुमिओन कारचे इंजिन आणि मायलेज..
टोयोटाने आपल्या 7 सीटर कार रुमिओनमध्ये 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले आहे. मारुती एर्टिगामध्येही हे इंजिन वापरले आहे. Toyota Rumion मध्ये बसवलेले हे पेट्रोल इंजिन 103 BHP ची कमाल पॉवर आणि 137 NM टॉर्क निर्माण करते. कंपनीने त्या इंजिनसोबत 6 – स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला आहे.

कंपनीने Toyota Rumion कारच्या CNG इंजिनसह 5 – स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स वापरला आहे. या कारचे CNG इंजिन 88 BHP ची कमाल पॉवर आणि 121.5 NM टॉर्क निर्माण करते. Toyota Rumion च्या पेट्रोल व्हेरियंट 20.51 kmpl आणि CNG ऑप्शन 26.11km/kg आहे..
टोयोटा रुमिओन कारचे फीचर्स..
टोयोटाने या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे मारुती एर्टिगाच्या विक्रीत सध्या मोठी घट होत आहे. Toyota Rumion कारमध्ये 7 – इंचाची टचस्क्रीन सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो – कारप्ले आहे. वायरलेस ऍपल कारप्ले, पेडल शिफ्टर्स, ऍटोमॅटिक सेफ्टीसाठी चार एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल आणि बॅक पार्किंग कॅमेरा यासह अनेक लेटेस्ट फीचर्स देण्यात आली आहे.
टोयोटा Rumion कारची किती आहे किंमत..

टोयोटाने या 7 सीटर कारची किंमत फार जास्त ठेवली नाही. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या कारची एक्स -शोरूम किंमत 10.29 लाख ते 13.68 लाख रुपये आहे. तुम्ही Toyota Rumion चे बेस व्हेरिएंट विकत घेतल्यास, तुम्हाला त्यासाठी 10.29 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटसाठी 13.68 लाख रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे, ऑन-रोड किंमत जाणून घेण्यासाठी जवळच्या एक्स-शोरूमला भेट द्या..
बुकिंगसाठी लिंक :- toyotabharat.com
