बीडकरांचं सर्वात मोठं स्वप्न होणार पूर्ण! आता अहमदनगर – न्यू.आष्टी – अंमळनेरपर्यंत धावणार रेल्वे, पहा असा असणार रूट..

23 डिसेंबर 2022 रोजी आष्टी येथून न्यू आष्टी – अहमदनगर रेल्वेची सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अंमळनेर पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने नगर – अंमळनेरपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. आष्टी – अहमदनगर – बीड – परळी नवीन लाईनची एकूण लांबी 261.25 कि.मी.इतकी आहे. त्यापैकी 66.18 कि.मी.चे काम मागील वर्षी 23 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण झाले.

त्यानंतर नगर ते न्यू. आष्टी फेरी सुरू झाली आहे. या न्यू.आष्टी ते बीड जवळील विघ्नवाडी हा 67.12 कि.मी.रेल्वे मार्ग पूर्ण होत आहे. यावर्षी अखेर अहमदनगर ते विघ्नवाडी बीडजवळपर्यंत रेल्वे धावणार आहे.

एकूण 261.25 कि.मी. पैकी 133.3 कि.मी.चे काम आता पूर्ण होऊन लवकरच रेल्वे धावणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून बीडकर यांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे.

अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. हा मार्ग एकूण 261.25 कि.मी.चा आहे. यापैकी 23 सप्टेंबर 2022 रोजी अहमदनगर न्यू. आष्टीपर्यंत पूर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरी सुरू झाली. आता दुसऱ्या टप्प्यात न्यू. आष्टी ते बीड जवळील विघ्ननवाडी हे काम या वर्षाखेर पूर्ण होत आहे.

Leave a Comment