Soybean Rate : अवकाळीने हजेरी लावली अन् सोयाबीनचे दर पुन्हा घसरले, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट..

सोयाबीनच्या दरात नोव्हेंबर महिन्यात आलेली तेजी डिसेंबर महिना सुरू होताच उतरली. सोयाबीनचा दर आज चार हजार ८३० रुपयावर आल्याने आणखी चिंता वाढली. जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचे उत्पादन नगन्य आहे सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या पिकाला योग्य भाव मिळालेला नाही. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात तेजी होईल अशी अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार भाव तेजीत आले.

नोव्हेंबर महिन्यात पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या दरात सोयाबीनची खरेदी झाली. ग्रामीण भागात सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाच हजार दोनशे रुपये क्विंटलच्या भावात खरेदी सुरू केल्याने अनेकांनी घरी असलेले सोयाबीन राखून ठेवले.

अवकाळी पावसाचे आगमन होण्यापूर्वी सोयाबीनचा दर वाढल्याने बाजारपेठेत आवक वाढली होती. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर दर घसरला. ३९०० रुपये क्विंटलपासून सोयाबीनला मागणी होत आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला जिल्हयातील हिंगणघाट बाजार समितीत सोयाबीनची ४५०० ते ४८३० रुपये हा दर देण्यात येत आहे. मिळणारा दरही नगण्य आहे.

जिल्हयातील हिंगणघाट बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक आहे.तेथे आज चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. वर्धा, सेलू, आर्वी या बाजार समितीमध्ये ४३०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल च्या दरातच सोयाबीनची खरेदी झाली शेतकऱयांना असलेली आर्थिक अडचण दूर करण्याकरिता सोयाबीन विक्री शिवाय पर्याय नाही अशातच पडलेला दर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारा आहे.

Leave a Comment