महाकृषी ऊर्जा अभियानतंर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंप वीज सौरऊर्जेद्वारे जोडण्यासाठी प्रधानमंत्री कुसूम – ब योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी बोडक यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषीपंप शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषीपंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत.
सौर कृषीपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतनुसार प्रगवांतील खुल्या शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरता येईल. शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास 1 लाख 4 हजार 823 सौर कृषिपंपासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार लोकसंख्येच्या आधारावर जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित केले आहे. महाऊर्जामार्फत सद्यस्थितीत सुमारे 77 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित केले आहेत.
पोर्टलवर शेतकऱ्यांकडून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरणे व पुरवठादाराची निवड करण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाऊर्जाकडून करण्यात आले आहे.
किती भरावा लागणार लाभार्थी हिस्सा..

कसा कराल अर्ज :-
ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते सरकारच्या अधिकृत वेबसाइट kusum.mahaurja.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
टीप : शेतकरी मित्रांनो हा अर्ज करणं जरासं कठीण असल्याने तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सेवा (CSC) केंद्रावरही अर्ज करू शकता..
