शेतकऱ्यांना स्वस्त दरात कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी उपकरणांच्या खरेदीवर अनुदान देण्यात येत आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेअंतगत अर्ज करू शकता..
या कृषी यंत्रांवर दिले जाते अनुदान..
महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपकरण अनुदान योजनेंतर्गत, रोटाव्हेटर, श्रेडर / मल्चर, चाफ कटर (ट्रॅक्टर / इलेक्ट्रिक चालित), रीपर (स्वयंचलित / ट्रॅक्टरचलित) रोटाव्हेटर, रीपर कम बाइंडर, कल्टीव्हेटर, ट्रॅक्टर माउन्टेड / ऑपरेटेड स्प्रेयर,थ्रेशर, कडबा कुट्टी ई. कृषी अवजारे उपलब्ध आहेत.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त दरात महागडी कृषी उपकरणे मिळतात. ही योजनेकरिता तुम्ही वर्षभरात कधीही अर्ज करू शकता, अर्ज केल्यानंतर लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते.
कृषी उपकरणांवर किती अनुदान मिळणार ?
राज्य शासन शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्के अनुदान कृषी उपकरणांच्या खरेदीवर देणार आहे. अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 50 ते 60 टक्के अनुदान देण्यात येणार येत आहे. शेतकऱ्यांना जीएसटी आणि इतर कर भरावे लागतील. अधिक माहितीसाठी, तुम्ही पोर्टलवर दिलेल्या कॅल्क्युलेटरद्वारे ही माहिती मिळवू शकता..
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
शिधापत्रिका
शेतजमिनीची कागदपत्रे
शेतकऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र
शेतकऱ्याचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जो आधारशी जोडलेला आहे.
अर्जदाराचे किसान कार्ड
बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज कसा कराल ? ..
कृषी उपकरणांच्या खरेदीवर अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
यासाठी राज्यातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात.
यासाठी अधिकृत वेबसाइट लिंक mahadbt.maharashtra.gov.in आहे. या लिंकवरून तुम्ही अर्ज भरू शकता..
या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जांमधून लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
या कृषी उपकरणांसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांची लॉटरी काढण्यात येते. जी महाडीबीटी पोर्टलवर प्रदर्शित केली जाते.
