बहुतेक लोकांना बाइक चालवायला आवडते. पण जेव्हापासून बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तेव्हापासून पेट्रोल इंजिन असलेली बाईक घेण्यापूर्वी खूप विचार केला जात आहे. कारण आता बाईकपेक्षा पेट्रोलवरच जास्त खर्च होताना दिसून येत आहे.
अशा परिस्थितीत लोकांकडे इलेक्ट्रिक बाईक हा एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हीही एक उत्तम इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात आधीच जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक उपलब्ध आहेत. चला तर मग त्या बाईकबद्दल अधिक डिटेल्समध्ये जाणून घेऊया..
3.24kwh मोठा बॅटरी पॅक..
आपण ज्या इलेक्ट्रिक बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, ती जवळपास एक वर्षापूर्वी बाजारात लॉन्च झाली होती, जी आतापर्यंतची मार्केटमधील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बाइक ठरली आहे. या इलेक्ट्रिक बाइकच्या मॉडेलला Rivolt RV 400 इलेक्ट्रिक बाइक असे नाव देण्यात आलं आहे.
ही इलेक्ट्रिक बाईक एका चार्जवर 150 किलोमीटरची रेंज देत असून ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. कंपनीने प्रदान केलेल्या 3.24kwh क्षमतेसह एक उत्कृष्ट लिथियम आयन बॅटरी पॅक असल्यामुळे हे शक्य झालं आहे.
किंमतही बजेटमध्ये..
या इलेक्ट्रिक बाइकची किंमत तुमच्या बजेटनुसार ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण एवढी चांगली रेंज पाहण्यासोबतच तुम्हाला त्यात अनेक उत्तमोत्तम फीचर्सही पाहायला दिले आहेत. असे असूनही, ते खरेदी करण्यासाठी, भारतीय बाजारपेठेत 1 लाख 30 हजारची एक्स – शोरूम किंमत आहे. या बाईकचे डिझाईन इतकं अप्रतिम ठेवण्यात आले आहे की, ती पेट्रोल बाईकपेक्षा वेगळी दिसत नाही.

85Kmph चे जबरदस्त वेग..
यामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर पाहायला मिळते. ज्याद्वारे ती 85km / तास इतका टॉप स्पीड देण्यास सहज सक्षम आहे. या व्यतिरिक्त, जर आपण त्याच्या चार्जिंग कपॅसिटीबद्दल बोललो तर, नॉर्मल चार्जद्वारे बॅटरी फक्त 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
याशिवाय यामध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला स्टार्ट बटण, यूएसबी पोर्ट, नेव्हिगेशन, अँटी थेफ्ट अलार्म, मोबाइल कनेक्टिव्हिटी, जीपीएस, रिव्हर्स असिस्ट आणि इतर फीचर्स देण्यात आले आहे.
