सर्वांना माहीत आहे की, सौर पॅनेलवर भारत सरकारकडून सबसिडी दिली जाते. नुकतेच सौर अनुदानाबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 2024 च्या नुकत्याच आलेल्या बजेटमध्ये एक सोलर स्कीम सुरु करण्यात आली आहे ज्या अंतर्गत 1 कोटी लोकांच्या घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत सोलर पॅनलवर मिळणाऱ्या सबसिडीबाबत एक बातमी समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोफत वीज योजना जाहीर केली. त्याचे नाव आहे ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना’ जी सोलर रुफटॉप योजना आहे.
या योजनेंतर्गत 1 कोटी घरांना मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेत सरकार 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट दरमहा 300 युनिट मोफत वीज देऊन 1 कोटी घरांना प्रकाश देणे आहे..
या नवीन सबसिडी योजनेअंतर्गत, सरकार मध्यमवर्गीय लोकांच्या घरात मोफत सौर पॅनेल बसवणार आहे. ज्यावर भारत सरकारकडून सबसिडी दिली जाते.
अनुदानाच्या नव्या किंमती..
पूर्वी सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत 40% अनुदान दिले जात होते, ते आता 60% करण्यात आले आहे. याचा अर्थ, या योजनेंतर्गत जेव्हा जेव्हा सोलरपॅनेल बसवले जातील तेव्हा 60% अनुदान सरकारकडून दिले जाईल अन् उर्वरित 40% अनुदानही तुम्हाला कर्ज म्हणून दिले जाणार आहे.
1kW टू 3kW पर्यंत 78,000 सबसिडी :- सबसिडी स्ट्रक्चर पाहण्यासाठी इथे करा क्लिक..
आणि आता या कर्जाची परतफेड सरकार नाही तर तुमच्या रुफटॉपचा वापर करून सोलर पॅनलपासून बनवलेली युनिट्स विकून करणार आहे..
PM सूर्य घर योजना..
कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 10 वर्षांचा आहे, म्हणजेच 10 वर्षांसाठी हे सौर पॅनेल सरकारचे असेल आणि 10 वर्षानंतर हे सौर पॅनेल पूर्णपणे तुमचे होईल.
तुम्हाला माहीत असेलच की, सोलर पॅनलची वॉरंटी 25 वर्षांसाठी आहे, म्हणजेच उर्वरित 15 वर्षे या सोलर पॅनेलचा वापर केल्यास मोफत विजेसह तुमची 15 ते 18 हजार रुपयांची बचत होणार आहे..
सोलर पॅनेलसाठी अर्ज कसा करावा ?
सर्व प्रथम पोर्टलवर नोंदणी करा. लिंक – https://pmsuryaghar.gov.in/
यानंतर Apply for the Rooftop Solar वर क्लिक करा.

त्यानंतर तुमचे राज्य निवडा. वीज वितरण कंपनी निवडा. त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक टाका. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाका. पोर्टलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करा.

ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉग इन करा. फॉर्मनुसार Apply for the Rooftop Solar साठी अर्ज करा. ( अर्ज करताना शेवटच्या टप्प्यात 500kb पर्यंतची आपले लाईटबील PDF फाईल अपलोड करायची आहे)
Discom कडून फिजिबिलिटी अप्रूव्हलची प्रतीक्षा करा. एकदा तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूव्हल मिळाल्यावर, तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून सोलर सिस्टीम इन्स्टॉल करा..
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे डिटेल्स जमा करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा..
नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
एकदा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. बँक खात्याचे तपशील द्या आणि पोर्टलद्वारे रद्द केलेला चेक जमा करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत जमा होईल.
ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर सिस्टमचे काय आहेत फायदे ?
वीजबिलात ग्राहकांची बचत.
उपलब्ध छतावरील जागेचा वापर, अतिरिक्त जमिनीची आवश्यकता नाही.
ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन लाईनसाठी अतिरिक्त गरज नाही.
विजेचा वापर आणि उत्पादन यांचा समतोल साधून, पारेषण आणि वितरण हानी कमी होते.
टेल – एंड ग्रिड व्होल्टेजमध्ये सुधारणा आणि सिस्टम कंजेशनमध्ये घट.
स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी, 1 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प एका दिवसात 4 ते 5.5 युनिट्स निर्माण करू शकतो..
