CIDCO Lottery : सिडकोच्या घरांच्या किमतीत मोठी घट ! मुंबईत 715 स्के. फिटचा फ्लॅट फक्त 27 लाखांत, पहा डिटेल्स..

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील बामणडोंगरी येथील घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या लाभासह अंदाजे 27 लाखांत सदनिका मिळणार आहेत.

बामणडोंगरी येथील 35 लाख 30 हजार किमतीची सदनिका आता 29 लाख 50 हजार या किमतीला उपलब्ध होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या 2.5 लाख रकमेच्या अनुदानामुळे यशस्वी अर्जदारांना ही सदनिका केवळ 27 लाख रुपयांना उपलब्ध होणार आहे.

सिडकोमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांकरिता महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मध्ये राबवली होती तर 17 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढण्यात आली असून एकूण 4 हजार 869 अर्जदार बामणडोंगरी येथील गृहप्रकल्पासाठी विजे ठरले होते.

नवी मुंबईच्या उल नोडमध्ये ही गृहनिर्माण योजन साकारण्यात आली आहे. यशस्व अर्जदारांना इरादापत्रे पाठवण्या आलेली असून, अर्जदारांनी साद केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व वाटपपत्र निर्गमन प्रक्रिय अंतिम टप्यामध्ये आहे. यामुळे अर्जदारांना लवकरच सदनिकांच ताबा मिळणे शक्य होणार आहे.

बामणडोंगरी, उलवे येथील अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत असल्याने घरासाठी 35 लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती कमी करण्याबाबतचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते.

त्यानुसार या सदनिकांच्या किमती तब्बल 6 लाखांनी कमी करण्यात येऊन, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या 2.5 लाख रकमेच्या अनुदानासह प्रत्यक्षात या सदनिका अंदाजे 27 लाख किमतीला उपलब्ध होणार आहेत.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यामुळे योजनेतील यशस्वी अर्जदारांना दिलासा मिळून त्यांचे नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

अनिल डिग्गीकर उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको..

Leave a Comment