गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई ते कानपूर, काठगोदाम, कटिहार दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 09075 मुंबई सेंट्रल – काठगोदाम सुपरफास्ट स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर बुधवारी सकाळी 11.00 वाजता निघेल आणि काठगोदामला दुसऱ्या दिवशी 14.30 वाजता पोहोचेल..
ही ट्रेन 24 एप्रिल ते 26 जून दरम्यान धावणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 09076 काठगोदाम – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल काठगोदाम येथून दर गुरुवारी 17.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 20.55 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन 25 एप्रिल ते 27 जून 2024 या कालावधीत धावणार आहे..
मुंबई सेंट्रल – कानपूर अन्वरगंज सुपरफास्ट..
ट्रेन क्र. 09185 मुंबई सेंट्रल – कानपूर अनवरगंज सुपरफास्ट स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर रविवारी 11.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15.35 वाजता कानपूर अन्वरगंजला पोहोचेल.
ही ट्रेन 21 एप्रिल ते 30 जून या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09186 कानपूर अनवरगंज – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल कानपूर अनवरगंज येथून दर सोमवारी 18.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 22.30 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन 22 एप्रिल ते 01 जुलै दरम्यान धावणार आहे..
मुंबई सेंट्रल – कटिहार स्पेशल..
ट्रेन क्रमांक 09189 मुंबई सेंट्रल – कटिहार विशेष मुंबई सेंट्रल दर शनिवारी सकाळी 10.30 वाजता सुटून सोमवारी सकाळी 7.30 वाजता कटिहारला पोहोचेल. ही ट्रेन 20 एप्रिल ते 29 जून दरम्यान धावणार आहे. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09190 कटिहार – मुंबई सेंट्रल स्पेशल कटिहार येथून दर मंगळवारी 00.15 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 18.40 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 23 एप्रिल ते 2 जुलै दरम्यान धावणार आहे. रेल्वेने या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू केले आहे..
