कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रा 3 मागिर्केचे लोकार्पण डिसेंबर 2023 मध्ये करण्यात येणार असल्याचे अपेक्षित होते. मात्र आरे येथील कारशेड आणि मेट्रो 3 मुख्य ट्रॅक जोडणी अजूनही पूर्ण झाली नसल्याचे मुंबई मेट्रो रेल लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. ही जोडणी पूर्ण झाल्यानंतरही विविध चाचण्या पूर्ण केल्यानंतरच एप्रिल 2024 पर्यंत मेट्रो 3 च्या पहिल्या टण्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले..
कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो 3 चा डिसेंबर 2023 पर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र डेडलाइन चुकल्याचे त्यांनी मान्य केले. अजूनही आरे कारशेड ते मुख्य ट्रॅक जोडणी पूर्ण करण्यास महिना उजाडणार असल्याचे भिडे यांनी यावेळेस सांगितले. ही जोडणी पूर्ण झाल्यावरच विविध सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्याचे काम 2 ते अडीच महिन्यांत पूर्ण करणार आहे. जोपर्यंत सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मेट्रो सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे येत्या 3 ते 4 महिन्यांत म्हणजेच एप्रिल 2024 रोजी लोकार्पण अपेक्षित असल्याचे भिडे यांनी यावेळेस स्पष्ट केले. मेट्रो 3 मुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टण्याचे लोकार्पण झाल्यानंतर 6 महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबर – नोव्हेंबर 2024 दरम्यान संपूर्ण 33.5 किमी भुयारी मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही भिडे यांनी यावेळेस सांगितले.
33.5 किमीच्या अंतरात 27 स्टेशन्स..
मुंबई मेट्रोची लाईन – 3 (अक्वा लाईन) ही 33.5 किमी लांबीची मेट्रो लाईन असून कफ परेड – BKC – आरे कॉलनी यांना जोडणाऱ्या तब्बल 27 स्टेशन्सवर थांबा देण्यात आला आहे.

स्टेशनची नावे :-
कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स), विद्यानगरी, सांताक्रूझ, CSIA टर्मिनल 1 (डोमेस्टिक एयरपोर्ट), सहार रोड, CSIA टर्मिनल 2 (इंटरनॅशनल एयरपोर्ट), मरोळ नाका, MIDC, SEEPZ आणि आरे कॉलनी..
