सन 1932 पासून प्रथम मागणी झालेल्या डहाणू ते नाशिक असे 155 किमी रेल्वे मार्ग प्रस्ताव मंजुरी संबंधी याबाबत पुनर्विचार करण्याची आश्वासन रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिल्यानंतरही त्यात कोणतीही प्रगती नाही. डहाणू आणि नाशिककरांची मागणी अजून प्रलंबित आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनीही यासाठी मान्यता देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता.
मागे डहाणू – नाशिक रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण आणि पाहणीही झाली आहे. केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न केले तर या भागातील भौगोलिक विकासाला चालना मिळेल. अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेमार्गासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करत नसल्याने नागरिक नाराज आहेत. डहाणू – नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी 20 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने हा रेल्वे मार्ग प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले..
सन 1932 मध्ये ब्रिटिश सरकारच्या राजवटीत डहाणू ते नाशिक रेल्वे मार्गाची मागणी केलेली आहे. या मार्गात डहाणू ते नाशिक 155 किमी अंतराच्या पट्ट्यात आहे. हे अंतर पालघर, ठाणे, नाशिक अशा तीन जिल्ह्यांत मोडते.
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई नजीक असल्याने मुंबईकरांनाही दळणवळणासाठी दिलासा मिळेल. माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी व माजी रेल्वे मंत्री कै. राम नाईक, तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी डहाणू – नाशिक रेल्वे मार्ग पुनरुज्जीवन करण्यासाठी मान्यता दिली होती.
याबाबत अध्यक्ष ठाणे जिल्हा रेल पॅसेजर असोसिएशनच्या अध्यक्षांनी 20 जुलै 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले आहे. सन 1932 साली केलेल्या डहाणू ते नाशिक रेल्वेची मागणी सन 1952 च्या पहिल्या लोकसभेपासून डहाणू ते नाशिक रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने झालेली आहे.
सन 1952 मध्ये तात्कालीन खासदार नंदकर आणि सन 1957 च्या लोकसभेत जव्हारचे खासदार व राजे यशवंतराव मुकणे यांनी या मागणीसाठी लोकसभेत आवाज उठवला.
स्वातंत्र्यपूर्व काळात जव्हारचे तत्कालीन राजे मार्तंडराव मुकणे यांनी नाशिक – डहाणू रेल्वे मार्गाची सर्व प्रथम ब्रिटिश सरकारकडे मागणी केली आहे. सन 1962 ते 2009 पर्यंत लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांनी उपरोक्त डहाणू ते नाशिक रेल्वे मार्गाची मागणी लावून धरली . माजी खासदार कै. दामू शिगडा , माजी खासदार कै. शंकर नम, माजी खासदार कै. चिंतामण वनगा तसेच अनेकांचा यात समावेश होता. डहाणू ते नाशिक रेल्वे मार्ग पुनरुजीवित करून तातडीने मंजुरी देण्याची मागणी होत आहे.
