राज्यभरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. जिल्ह्यात निघालेली एल्गार रथयात्रा, त्यानंतरचा एल्गार महामोर्चा, मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी गेलेले हजारो शेतकरी आणि सोमठाण्यात तुपकरांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनापुढे सरकार अखेर झुकले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तुपकरांच्या आंदोलनातील बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचाही समावेश होता. त्यानुसार राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा पहिला रिझल्ट असल्याचे मानल्या जात आहे. 28 व 29 नोव्हेंबर रोजी हजारा शेतकऱ्यासह मुंबईत धडक दिली होती. शेतकऱ्यांचे हे वादळ पाहता सरकारने रविकांत तुपकर यांना चर्चेचे निमंत्रण दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सरकारसोबत झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर आ.डॉ. राजेंद्र शिंगणे व आ.डॉ. संजय कुटे यांनी पिकविम्याचा विषय ताकदीने लावून धरला होता.
pmfby.gov.in इथे क्लीक करून तुमचा पीक विमा पहा..
नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी या बैठकीत लावून धरली होती. त्याला यश आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात 49 लाख 5 हजार 032 शेतकऱ्यांना 2,086 कोटी 54 लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे व त्याचे वाटपदेखील चालू झाले आहे. जिल्ह्यातील 36 हजार 358 शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा म्हणून 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर झाली आहे तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी जीव धोक्यात घालून आंदोलन केले, त्याचे फलित आता दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
एआयसी कंपनीला इशारा
राज्यात 49 लाख 5 हजार 32 शेतकऱ्यांना 2086 कोटी 54 लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला मंजूर झालेली 18 कोटी 39 लाख अग्रीम पीकविम्याची रक्कम ही सर्वात कमी आहे, त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळून एका महिन्याचा आत 100 टक्के फायनल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी; अन्यथा मुंबईतील एआयसी कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
