Onion Price : निर्यातबंदी असतानाही कांद्याचे भाव 3 हजारांपार ! ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर..

निर्यातबंदी असतानाही कांद्याचे भाव पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील पाच बाजार समितींमध्ये शुक्रवारी कांद्याचा कमाल भाव 3000 रुपये प्रति क्विंटलवरपर्यंत पोहोचला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगला भाव मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

कारण निर्यातीपूर्वी शेतकऱ्यांना कांद्याचा घाऊक भाव 4,000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत होता. तर 7 डिसेंबरला निर्यात थांबल्यानंतर अवघ्या दोन – तीन दिवसांत कमाल भाव 1500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला होता. आता पुन्हा एकदा बाजार समितींमध्ये कांद्यांच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे.

महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी कोल्हापुरात कांद्याचा कमाल भाव 3100 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. निर्यातबंदीनंतरची ही सर्वोच्च किंमत आहे. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुण्यातील कामठी, नागपूर आणि सातारा येथील बाजार समित्यांमध्ये कमाल 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव नोंदविला गेला. तर किमान भाव 500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे. तर निर्यातबंदीनंतर लगेचच काही बाजार समित्यांमध्ये किमान भाव केवळ 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटल राहिला..

भाव पाडण्यासाठी सरकारने प्रत्येक युक्ती वापरली..

कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने आतापर्यंत प्रत्येक युक्त्या वापरल्या. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकारकडे आता शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे दुसरे हत्यार राहिलेले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने सर्वप्रथम ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले. आणि त्यानंतर किमान निर्यात किंमत $800 निश्चित करण्यात आली. नाफेड आणि NCCF पेक्षा कमी दराने कांद्याची विक्री झाली. त्यानंतरही भाव उतरला नाही म्हणून निर्यात बंद झाली. आता निर्यातबंदीच्या महिनाभरानंतर पुन्हा हळूहळू भाव वाढू लागले आहेत.

कांद्याचे भाव वाढण्यामागचं काय हे कारण ?

देशातील कांद्याचे उत्पादन यंदा घटले आहे. उत्पादनात सुमारे 10 टक्के घट झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. रब्बी हंगामातही लागवड कमी होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे दर कमी करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात आहेत. ऑगस्ट 2023 पासून असे दिसून आले आहे की, जेव्हा – जेव्हा सरकार कांद्याचे भाव कमी करण्याचा निर्णय घेते तेव्हा काही दिवस भाव कमी होतात पण नंतर उत्पादन कमी होते म्हणून वाढू लागले आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी सध्या खरीप हंगामातील कांदा साठवून थोडा – थोडा बाजारात घेउन येत आहे. तसं पाहिलं तर खरीप हंगामातील कांदा मोठ्या प्रमाणात साठवता येत नाही. निर्यातबंदी असतानाही कांद्याच्या किंमती वाढत असल्याने अजून काही काळ तरी निर्यात सुरू होणार नसल्याचं एक्सपर्टकडून सांगितलं जात आहे.

पहा आजचे कांदा बाजारभाव..

Leave a Comment