2023 च्या समाप्तीपूर्वी, ऑटोमेकर्स त्यांच्या वाहनांची जास्तीत जास्त युनिट्स विकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नवं नाव जोडलं आहे, इलेक्ट्रिक टू व्हीलर प्रॉडक्शन टॉर्क मोटर्स ज्याने त्याच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक मोटरसायकल Tork Kratos R. वर मोठ- मोठ्या डिस्काउंट ऑफर देऊ केल्या असून त्या नववर्ष 2024 मध्येही अजून काही दिवस सुरु ठेवले आहे. काय आहे ही ऑफर ? तुम्हाला किती डिस्काउंट मिळणार ? त्याबाबत जाणून घेऊयात..
टॉर्क मोटर्सने त्यांच्या प्रॉडक्शन टॉर्क क्रॅटोस आर वर इयर एंड डिस्काउंटबद्दल माहिती दिली आहे, ज्या अंतर्गत कंपनीकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिली जात आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी वर्षाच्या अखेरीस 32,500 रुपयांपर्यंत प्रचंड डिस्काउंट देऊ केली आहे, ती नववर्षातही सुरु ठेली आहे. ही बाईक खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक अजूनही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात..
याव्यतिरिक्त, टॉर्क कंपनीने आपल्या ग्राहकांना 10,500 रुपये किमतीचे फ्री स्पेशल सर्व्हिस बंडल ऑफर करत आहे, ज्यात एक्सटेंडेट वॉरंटी, डेटा शुल्क, नियतकालिक सेवा शुल्क आणि चार्जपॅक यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक बाईकमध्ये स्पेसिफिकेशन..
Kratos R ला उर्जा देण्यासाठी, कंपनीने 9kW (12 bhp) इलेक्ट्रिक मोटर जोडली आहे, जी 4kWh, IP67 प्रमाणित, लिथियम-आयन बॅटरी पॅकसह 38 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 4 kWh लिथियम आयन बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर बाईक 180 किलोमीटरची IDC (इंडियन ड्रायव्हिंग सायकल) राइडिंग रेंज देते. त्याचे टॉप स्पीड देखील सुमारे 105 किमी प्रति तास आहे. फास्ट चार्जरच्या मदतीने ही बाईक एका तासात 80 टक्के चार्ज होते आणि केवळ 3.5 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग वाढवते..
जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर, पूर्वीची किंमत 1.68 लाख रुपये आहे, तर नंतरचे 1.87 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.
