मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यात नोंदणी केलेल्या 1 लाख 27 हजार 857 प्रशिक्षणार्थीपैकी 1 लाख 20 हजार 990 प्रशिक्षणार्थीनी आपला उमेदवारीचा कार्यकाल पूर्ण केला. प्रशिक्षणार्थीपैकी 1 लाख 14 हजार 462 जणांना मानधन देण्यासाठी सरकारने 306 कोटी 5 लाख रुपये खर्च केले, अशी माहिती राज्याच्या कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू झाली. ‘लाडकी बहीण योजने’ नंतर सुरू केलेल्या या योजनेचे शिंदे यांनी ‘लाडका भाऊ’ असे नामांकन केले आहे. ही योजना त्यामुळे चांगलीच चर्चेत आली. योजनेसाठी राज्यातून अर्ज मागवण्यात आले होते.
1 लाख 27 हजार 857 प्रशिक्षणा थींनी शासनाकडे नोंद केली. राज्य सरकारच्या विविध विभाग आणि शासनमान्य संस्थांनी 80 हजार 350, तर खासगी कंपन्यांकडून 47 हजार 507 अशा एकूण 1 लाख 20 हजार 990 प्रशिक्षणार्थीना ही इंटर्नशिप देण्यात आली.
6 ते 10 हजार मानधन
या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणाथींना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदविकाधारक प्रशिक्षणार्थीना 8 हजार रुपये आणि पदवीधर तसेच पदव्युतर प्रशिक्षणार्थीना 10 हजार रुपये मानधन दिले जाते.
सहा महिन्यांचे प्रशिक्षण
18 ते 35 वयोगटातील प्रशिक्षणार्थीना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाधींना त्यासाठी सरकारी वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करवी लागते. राज्यात ग्रामपंचायत कार्यालये, विविध सरकारी विभाग आणि महामंडळे तसेच खासगी कंपन्यांमध्ये संधी दिल्या जातात.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी असे करा रजिस्ट्रेशन..

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, आकाशवाणी समोर, सावेडी रोड, अहिल्यानगर या कार्यालयास भेट द्या..
दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा योजना समन्वयक श्री. वसीमखान पठाण मो. नं. 9409555465, श्री. मच्छिंद्र उकिर्डे मो. नं. 9595722424, श्री. संतोष वाघ मो. नं. 8830213976, श्री. बद्रिनाथ आव्हाड मो. नं. 9420725280, श्री. योगेश झांजे मो. नं. 9588408890 यांच्याशी संपर्क साधावा.
पुणे विभाग आघाडीवर, कोकण मागे..
या योजनेअंतर्गत राज्यात पुणे विभाग आघाडीवर, तर कोकण सर्वात मागे आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार, पुणे येथे सर्वाधिक 31 हजार 001 प्रशिक्षणार्थींची नोंदणी झाली. कोकण विभागात सर्वात कमी 11 हजार 685 प्रशिक्षणार्थीची नोंदणी झाली. अमरावती विभागात 15 हजार 218, नागपूर विभागात 14 हजार 332, नाशिक विभागात 26 हजार 611 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 29 हजार 10 प्रशिक्षणार्थींची नोंदणी झाली होती..
