होम, कार आणि पर्सनल कर्जदारांना मोठा दिलासा ! EMI मध्ये होणार मोठी घट, पहा कॅल्क्युलेशन..

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली. यामुळे देशभरातील गृह कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्याजदर कपातीमुळे गृह कर्जाचे हप्ते कमी होण्याचे संकेत असून नवीन घर खरेदीला यामुळे चालना मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये गृह कर्जाच्या व्याजदरात सुमारे 2.5 टक्क्यांची वाढ झाली होती. यामुळे गृह कर्जाचे हप्ते वाढत होते.

सध्या गृह कर्जाचा व्याजदर 8.6 टक्के आहे. तो प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत अधिक आहे. बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई म्हणाले, घर खरेदीदारांमध्ये जास्त प्रमाण मध्यमवर्गीयांचे असते. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यात होणारी 500 ते 1000 रुपयांची कपातही मोठी असते.

उद्योग, व्यवसायांना अल्पदरात कर्ज उपलब्ध झाल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळून घरांच्या मागणीत वाढ होऊ शकते. अचानक हप्त्यात होणारी वाढ खरेदीदाराचे आर्थिक गणित बिघडवते. बांधकाम व्यावसायिक अभिजित मगदूम म्हणाले, हप्ते भरून लोकांकडे काही शिल्लक राहिले, तर ते घर खरेदीचा विचार करतात.

परंतु आता त्यांना दिलासा देत 0.25 टक्के कपात झाली आहे; पण गेल्या पाच वर्षांत झालेली वाढ पाहता त्यात अजून कपात होण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशात 3 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. बांधकाम व्यावसायिक गिरीश रायबागे म्हणाले, या निर्णयामुळे जास्त लोक घर खरेदीकडे वळतील. खरेदीची क्षमता वाढेल. नवीन गृह कर्ज मंजूर करताना किती मासिक हप्ता कर्जदार भरू शकेल, यावर कर्ज निश्चित होते. व्याजदर कमी झाल्याने कर्जाची मंजूर रक्कम वाढेल.

असा होईल फायदा..

कर्ज 50 लाख आहे, त्यांना मासिक हप्ता 44,986 रुपये आहे. 0.25 टक्के कपात केल्यानंतर हप्ता 43,086 रुपयांपर्यंत कमी होईल. यामुळे दरमहा 1900 रुपयांची बचत होईल. एकूण व्याज रक्कम 57.96 लाखांवरून 53.6 लाख रुपये होईल. म्हणजेच 4.36 लाखांची बचत होईल. हप्ता कायम ठेवल्यास कर्ज मुदत 10 महिन्यांनी कमी होईल.

Leave a Comment