आता Car घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं होणार पूर्ण ! Tata Nano Ev लाँच होणार, 300 किमी रेंज, जबरदस्त फीचर्स, किंमतही स्वस्त..

सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक टू – व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांची विक्रीही सातत्याने वाढत आहे. दरम्यान, भारतातील सर्वात लोकप्रिय आणि परवडणारी कार टाटा नॅनो (Tata Nano) तिच्या इलेक्ट्रिक व्हर्जनच्या लॉन्चमुळे चर्चेत आहे. आज आपण नॅनोबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया..

टाटा नॅनोचा आकर्षक लुक हा मारुती -सुझुकीचा बिझनेस नक्कीच खाली आणू शकतो. टाटा नॅनोला तब्बल 300 किमीची रेंज देणार असल्याचा दावा टाटाने केला आहे.

टाटा इलेक्ट्रिक ही नॅनो कार आपल्या खास शैलीत लॉन्च करणार आहे. आता परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होणार असून हे हायटेक फीचर्ससह उपलब्ध असणार आहे..

नॅनोला मिळणार पॉवरफुल बॅटरी..

अपकमिंग मिड साईझ इलेक्ट्रिक SUV Tata Nano मधील ग्राउंड क्लीयरन्सला खूप मोठा आकार मिळाला आहे. यासोबतच यामध्ये अलॉय व्हील देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला 15.5 kwh ची लिथियम आयन बॅटरी मिळणार आहे. ती BLDC मोटरशी जोडलेली आहे. यामध्ये फास्ट चार्जिंगचा ऑप्शनही देण्यात आला आहे. हा बॅटरी पॅक चार्जिंगसाठी 4 ते 5 तास लागणार आहे.

जबरदस्त रेंज अन् किंमतही बजेटमध्ये..

या अपकमिंग इलेक्ट्रिक कारला 300 किमीची रेंज मिळणार आहे. ही कार तुम्हाला 72V चा पॉवर पॅक देऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 60-80 किमी प्रति तास असणार आहे. त्याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतेही अपडेट मिळालेलं नसलं तरी तज्ज्ञांच्या मते, या कारची एक्स – शोरूम किंमत जवळपास 5 लाखांच्या आसपास असणार आहे..

Leave a Comment