मास्टरस्ट्रोक ! न्यू जनरेशन Swift 4-व्हील ड्राइव्ह मध्ये, इंजिनही नवं तर तब्बल 13 कलर ऑप्शन, कधी होणार लॉन्च ?

आता मारुती सुझुकीच्या नव्या स्विफ्टचे डिटेल्स समोर आले आहे. कंपनीने हे हॅचबॅक जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये सादर केला आहे. नवीन स्विफ्ट अपग्रेड केलेल्या डिझाइनसह येणार आहे. याचे केबिन इंटेरियर आणि एक्सटेरिअर अनेक नवीन टेक्नॉलॉजीसह अपग्रेड केलं गेले आहे, आता त्याच्या इंजिन आणि कलरबद्दल माहिती समोर आली आहे.

आता स्विफ्टला न्यू इंजिन मिळणार आहे. पुढच्या वर्षी 2024 मध्ये नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट लाँच होईल असे मानले जात आहे. सुझुकीने या जपानी – स्पेक कारमधील फीचर्सची यादी इंफोटेनमेंट सिस्टम, लेव्हल 2 ADAS, एलईडी हेडलॅम्प आणि अनेक सेफ्टी फीचर्ससाठी नवीन OS सह अपग्रेड केली आहे.

नेक्स्ट जनरेशन स्विफ्टला मिळणार नवं इंजिन..

जपानी ऑटोमोबाईल कंपनी सुझुकीने स्पष्ट केलं आहे की, न्यू 1.2L 3 – सिलेंडर NA Z12E पेट्रोल इंजिन नवीन जनरेशन स्विफ्टमध्ये K12C युनिटची जागा घेतली जाणार आहे. बेस्ट इफिशियनरीसाठी ते माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीसह MZ आणि MX ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे. XG ग्रेड हा नॉन – हायब्रीड असून इतरांप्रमाणे त्याला फक्त CVT ट्रान्समिशन मिळेल. सर्व 3 व्हेरियंट स्टॅंडर्डसह फोर व्हील – ड्राइव्ह सिस्टीमसह येणार असल्याने फरफॉर्मन्सही तगडा राहणार आहे. JDM – स्पेक न्यू स्विफ्ट लेटेस्ट सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स आणि EPB (इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक) सह येणार आहे.

13 कलर ऑप्शन..

न्यू जनरेशन स्विफ्ट एकूण 13 कलर ऑप्शन मध्ये येईल. यात 9 सिंगल – टोन आणि 4 ड्युओ – टोन कलरचा समावेश असेल. त्याच्या कलरबद्दल बोलायचं झाल्यास, त्यात मोनो – टोन शेड्स फ्रंटियर ब्लू पर्ल मेटॅलिक, कूल यलो मेटॅलिक, बर्निंग रेड पर्ल मेटॅलिक, सुपर ब्लॅक पर्ल, स्टार सिल्व्हर मेटॅलिक, फ्लेम ऑरेंज पर्ल मेटॅलिक, कॅरव्हान आयव्हरी पर्ल मेटॅलिक, प्युअर व्हाईट पर्ल आणि प्रीमियम सिल्व्हर मेटॅलिक यांचा समावेश आहे. यामध्ये ड्युअल – टोन कलर स्कीममध्ये ब्लॅक रूफसह ब्ल्यू, ब्लॅक रुफसह रेड, ब्लॅक रुफसह येलो आणि ब्लॅक रूफसह व्हाईटचा समावेश आहे..

न्यू जनरेशन स्विफ्टचे इतर डिटेल्स..

स्विफ्टच्या 3र्‍ या जनरेशनप्रमाणे, त्याची देखील एक डेव्हलपिंग डिझाईन आहे. त्याच्या फ्रंट फॅशियावर आता ग्रिलसाठी नवीन डिझाइनसह क्रोम ग्रिल मिळते, तर जुन्या स्विफ्टला रुंद स्लॅट होते. यात नेट्स डिझाइन अधिक आहे. प्रोफाइलमध्ये स्विफ्ट आपला लुक कायम ठेवते. त्याच्या डोअर, सेकंड लाईनच्या हँडलसाठी आणि व्हीलसाठी एक नवीन डिझाइन दिल जाणार आहे.

केबिनमध्ये मोठे बदल अपेक्षित होते, परंतु सुझुकीने अनेक सध्याचे कंपोनंट कायम ठेवून अपग्रेडचा मार्ग स्वीकारला आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग व्हील, बटन्स आणि टच सरफेस तसेच सेंटर कन्सोल हे सर्व कायम ठेवण्यात आले आहे, परंतु इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी न्यू डॅशबोर्ड, एसी कन्सोल आणि 10 – इंचाचा डिस्प्ले आहे. त्याची स्पर्धा Hyundai Grand i10 Nios, Renault Triber, Citroen C3, Tata Punch आणि Hyundai Exeter सोबत असणार आहे.

Leave a Comment