मध क्रांतीतून तरुणांना मिळणार रोजगाराची संधी ! पालघर जिल्ह्यातील घोलवड झाले राज्यातील तिसरे मधाचे गाव..

पालघर जिल्ह्यातील घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने केली आहे. घोलवड ग्रामपंचायत आणि या मंडळाच्या पालघर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमान घालवड टाकपाडा येथे मधाचे गाव जनजागृता मेळावा झाला. मूल्यांसाठा संघर्ष करा, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधाचे गाव योजनेतून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र साठ यांना ग्रामस्थाना केले. तर तरुणांना रोजगाराची संधी

मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी मधसंकलन ते ब्रँड विक्रीचे उद्दिष्ट सांगितले. तर बेटी बचाव स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तर मधपालनातून राणीमाशी वाचवण्याच वास्तव त्यांनी मांडले. या कार्यक्रम स्थळा तारपा नृत्याने मान्यवराचे स्वागत झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच कुणाल शहा यांनी करून मधाचे गाव संकल्पनेतून मधक्रांती यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला. शेतीची उत्पादकता घटत असताना मधमाशी पालनातून ही तूट भरून काढण्यासाठी या गावाच्या प्रत्येक घरात किमान पाच मधपेट्या ठेवण्याचा मानस आहे. या मोहिमेत महिला बचतगटाने पुढाकार घ्यावा, ग्रामपंचायत निधीतून 15 टक्के रक्कम (3 लाख रुपये) मधपेट्या ग्रामस्थांना वाटपासाठी गुंतवणूक करणार असल्याचे सरपंच रवींद्र बुजड यांनी सांगितले. हा पट्टा पर्यटन स्थळ असल्याने मध विक्रीने पंचक्रोशीत राजगार संधी वाढणार असल्याचे त्यांना सांगितले.

पालघर जिल्ह्यातील हे एकमेव गाव, पर्यटन स्थळाच्या नकाशावर यायला हवे, असे मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अंजना गायकवाड यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमात या मधाच्या गावाचा उल्लेख व्हावा इतके झपाटलेले कार्य करण्याची ऊर्जा निर्माण करा, असा आशावाद मेघा श्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सीमा सिंग यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

या मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी मधाचे गाव मधुबन या विशेष उपक्रमातून मध उत्पादन, संकलन आणि विक्री या कार्याची माहिती दिली. सागरी पट्ट्यातील राज्यातील हे एकमेव मधाचे गाव असून त्याला पर्यटन वाढीचा लाभ होईल, असा आशावाद व्यक्त केला. काळानुरूप वाघा इतकीच मधमाशी वाचवण्याची आवश्यकताही असल्याचे सांगितले. गावातील समुद्रकिनारा, अमृत सरोवर आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणांची माहिती मान्यवरांनी घेतली.

Leave a Comment