महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गटाने पिकविला विषमुक्त कापूस

श्वाश्वत शेती व शाश्वत विकासाची कास धरून येथील महात्मा ज्योतीराव फुले गटाने पर्यावरणाचा समतोल राखत विषमुक्त कापूस पिकविला आहे. पाणी फांऊडेशन अंतर्गत फार्मर कप 2023 स्पर्धेमध्ये भाग घेऊन लिहा बु .येथील शेतकऱ्यांनी गट स्थापन करुन यंदाच्या खरीब हंगामात कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले.

पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कपच्या पर्यावरण पुरक पद्धतीने रासायनिक खताचा प्रमाणात वापर, निंबोळी अर्क दशपर्णी अर्क, कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे, याद्वारे किडीचे व्यवस्थापन व जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. गाभणे यांच्या सल्यानुसार वेळोवेळी निळ्या रंगाचे कीटक नाशक, या पद्धतीचा अवलंब करुन व इर्जिक पद्धतीने शेतातील कामे करुन शेतीच्या खर्चात फार मोठी बचत करुन दाखवली आहे.

या पध्दतीने पिकवलेला कापूस हा टिव्हीयु इंडिया पुणे या संस्थेचे विषमुक्त तपासणी करीता कापूस सरकीचे नमुने पाठवण्यात आले होते. या संस्थेकडून कापूस नमुन्याला हिरवी झेंडी मिळाली असून नमुना हा विषमुक्त आलेला आहे.

त्यामुळे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी गटाने पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत शेती व शाश्वत विकासाची कास धरुन विषमुक्त शेतमाल पिकवणे ही काळाची मोठी गरज असल्याच्या उद्देश साध्य केला आहे.

Leave a Comment